शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाने मोडले कापूस उत्पादक शेतक-यांचे कंबरडे!

By admin | Updated: November 16, 2014 23:43 IST

बाजारात भाव पडले; सामाजिक सुरक्षितता म्हणून शासनाने हमी घ्यावी.

राजरत्न सिरसाट/ अकोलाकेंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्‍यांना निराशेच्या गर्तेत टाकले असून, बाजारातही कापसाचे सरासरी भाव ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे सरकले नसल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहे; पण येथेही कमी आणि जास्त लांबीच्या धाग्याचे निकष लावून ४0५0 रूपयांपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने या शेतकर्‍यांची सामाजिक सुरक्षितता म्हणून हमी घेण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी कापसाला हमीभाव (एमएसपी) जाहीर केले आहेत. यामध्ये मध्यम धाग्याच्या कापसाला ३९00 रुपये ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल भाव असून, लांब धाग्याच्या कापसाला ४0५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर केले आहेत; परंतु अल्प पावसामुळे यावर्षी विदर्भ, मराठवाड्यातील कापसाचे उत्पादन घटले असून, एकरी दोन ते तीन क्विंटलपेक्षा कमी उतारा आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावात तर उत्पादन खर्च निघणे दुरापास्त झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. राज्यात यावर्षी कापूस क्षेत्र घटले आहे. विदर्भात हे क्षेत्र १८ लाखाहून १२ लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. पूरक पाऊस नसल्याने यावर्षी कापूस पिकावर दुष्परिणाम झाला आहे. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने सामाजिक सुरक्षितता म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेल्या हमी भावापेक्षा २५ ते ३0 टक्के रक्कम राज्य शासनाने वाढवून दिल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सर्वच वस्तूचे भाव वाढतात, मग कापसाचे का नाही? शेतकर्‍यांवर सतत अन्याय होत आहे. यावर्षी तर पाऊसही नव्हता. त्यामुळे मूग, सोयाबीनसह सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने सामाजिक सुरक्षितता म्हणून कापसाचे भाव वाढवून द्यावे, अशी मागणी कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार यांनी केली आहे. *सीसीआयची खरेदी भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदी सुरू केली असून, अकोला जिल्हय़ातील आकोट येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे; पण सीसीआयनेदेखील कापसाचा धागा बघून, ३९00 ते ३९५0 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव दिले. *निर्यात घटणार! भारतातील कापसासाठी चीन हा मोठा आयातदार देश आहे; पण गतवर्षीचा कापूस चीनकडे शिल्लक असल्याने यावर्षी त्यांच्याकडून मागणी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला भाव नसल्याने येथील कापसाचे भाव पडले आहेत. याचा फटकाही यावर्षी शेतकर्‍यांना बसणार आहे.