CoronaVirus : उद्यापासून अकोलाही ‘लॉक डाऊन’; तीन दिवस राहणार जिल्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:14 IST2020-03-21T14:05:47+5:302020-03-21T14:14:50+5:30

२२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ‘लॉक डाऊन’ करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.

CoronaVirus: 'Lock Down' Akola from tomorrow; The district will remain closed for three days | CoronaVirus : उद्यापासून अकोलाही ‘लॉक डाऊन’; तीन दिवस राहणार जिल्हा बंद

CoronaVirus : उद्यापासून अकोलाही ‘लॉक डाऊन’; तीन दिवस राहणार जिल्हा बंद

अकोला : जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व पिंपरी चिंचवड ही मोठी शहरे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असतानाच आता अकोला जिल्हादेखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. २२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ‘लॉक डाऊन’ करण्याचा  आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. या कालावधीत जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. 
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, खबरदारीच्या  विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाची लागण एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीला होत असल्याने गर्दी टाळण्यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होते. या ठिकाणी कोरोनाबाधीत व्यक्ती आल्यास तिच्यापासून शेकडो लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २२ मार्च ते २४ मार्च या कालावधीत जिल्ह्यातील जिवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतला आहे. 

Web Title: CoronaVirus: 'Lock Down' Akola from tomorrow; The district will remain closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.