शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 10:26 AM

जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

ठळक मुद्देएकूण ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.आतापर्यंत संशयितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.त्यापैकी ३१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले.

अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नसला, तरी संशयित रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या संशयावरून मंगळवारी आणखी सात नवे रुग्ण दाखल झाले असून, एकूण ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. तर अकोट येथील रुग्ण निगेटिव्ह असल्याने त्याला सुटी देण्यात आली. बुलडाण्यात कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दि. ७ मार्च रोजी पहिला संशयित रुग्ण दाखल झाल्यापासून आतापर्यंत संशयितांची संख्या ४२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये अकोट येथील एका रुग्णाचा समावेश असून, त्याला मंगळवारी सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित असून, यामध्ये सोमवारी दाखल झालेले चार संशयित रुग्ण व मंगळवारी दाखल झालेल्या सात रुग्णांचा समावेश आहे. यातील तीन रुग्णांवर अतिदक्षता कक्षात, तर उर्वरित रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत.१८० रुग्णांची वैद्यकीय तपासणी कोरोना समुपदेशन कक्षात मंगळवारी १८० रुग्णांची तपासणी करून त्यांना समुपदेशन करण्यात आले. कक्ष सुरूझाल्यापासून आतापर्यंत २ हजार ७४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

घाबरून जाऊ नका; घरातच थांबा!

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यापासून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ आजारासाठी रुग्णालयात येणे टाळण्याच्या सूचना देऊनही लोक भीतीपोटी सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले. यावेळी बहुतांश रुग्ण साधी डोकेदुखे, सांधेदुखी, पाठदुखीसारख्या समस्या घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला