शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू; ९० रुग्ण वाढले, २८ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:28 IST

रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.

ठळक मुद्देतब्बल ९० नवे रुग्ण आढळून आले. २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.बाधितांची संख्या १५१० झाली आहे.

अकोला : संपूर्ण अकोला जिल्ह्यावर कोरोनाचा पाश आणखीनच घट्ट झाला असून, या संसर्गजन्य आजाराने मृत्यूमखी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. तब्बल ९० नवे रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाच्या बळींचा आकडा ७७ वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १५१० झाली आहे. दरम्यान, २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ३४५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यात अकोला जिल्हा कारागृहातील ५० पुरुष कैद्यांचा समावेश आहे.सकाळी आलेल्या अहवालात पातूर येथील सात जण, बाळापूर येथील सात जण,  टेकडीपुरा अकोट येथील सहा जण, राजदे प्लॉट येथील दोन जण तर उर्वरित अकोट, बार्शीटाकळी, देवी खदान, अशोक नगर, जुने शहर, व्हीएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १२ अहवालात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सात जण तारफैल, चार जण लहान उमरी येथील व खदान येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.तीन जण दगावलेरविवारी दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी एक अशोकनगर येथील ६२ वर्षीय पुरुष असून हा रुग्ण २६ रोजी दाखल झाला व त्याच दिवशी मयत झाला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. तर अन्य मयत हा बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून, तो १४ रोजी दाखल झाला होता. त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी दुपारी बार्शीटाकळी येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.२८ जणांना डिस्चार्जआज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच तर कोविड केअर सेंटर मधून २३ अशा २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ज्या रुग्णांना आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून ज्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सिंधी कँप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल, हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

३५८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १५१० पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७७ जण (एक आत्महत्या व ७६ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०७५ आहे. तर सद्यस्थितीत ३५८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.प्राप्त अहवाल-३४५पॉझिटीव्ह अहवाल-९०निगेटीव्ह-२५५आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५१०मयत-७७ (७७+१)डिस्चार्ज-१०७५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३५८

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला