दिलासादायक : दिवसभरात एकही कोरोनाबाधित नाही; २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 18:46 IST2020-04-12T18:38:41+5:302020-04-12T18:46:21+5:30
अकोलेकरांसाठी हा रविवार नक्कीच ‘पॉझिटिव्ह’ ठरला आहे.

दिलासादायक : दिवसभरात एकही कोरोनाबाधित नाही; २४ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
अकोला : सलग चार दिवसांपासून अकोल्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या अकोलेकरांसाठी चिंंतेचा विषय ठरत होती. परंतु, रविवारी एकही नवीन बाधित रुग्ण समोर आला नसून तब्बल २४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांसाठी हा रविवार नक्कीच ‘पॉझिटिव्ह’ ठरला आहे.
गत काहि दिवसांपासून जिल्'ात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. महिनाभरापासून कोरोनाच्या संदिग्ध रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. शिवाय, गत चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशातच शनिवारी एका बाधित रुग्णाने चक्क आयसोलेशन कक्षातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, रविवारची सकाळ अकोलेकरांना दिलासा देणारी ठरली.