शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 7:10 PM

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच ...

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ९ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०१९ वर पोहचली आहे. दरम्यान, रविवारी, ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३५६ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ११ महिला व २७ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा, केळकर हॉस्पिटल येथील पाच, खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अकोलखेड ता.अकोट येथील चार, पिंपरी ता.अकोट येथील दोन आणि खांबोरा येथील दोन अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.७५ वर्षीय महिलेचा मृत्यूशनिवारी रात्री मूर्तिजापूर शहरातील तेलीपुरा भागातील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ६ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.४१ जणांना डिस्चार्जकोरोनाचा संसर्ग होणाºयांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाºयांची संख्याही मोठी आहे. रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना घरी सोडण्यात आले.४८८ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या