CoronaVirus in Akola: 38 positive, 41 corona free | CoronaVirus in Akola : दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३८ पॉझिटिव्ह, ४१ कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची व नव्याने लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ९ आॅगस्ट रोजी मुर्तीजापूर शहरातील आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या बळींची संख्या ११६ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०१९ वर पोहचली आहे. दरम्यान, रविवारी, ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३९४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३५६ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये ११ महिला व २७ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील सात, दाळंबी येथील सहा, केळकर हॉस्पिटल येथील पाच, खांबोरा येथील तीन, खडकी येथील दोन, विठ्ठल नगर येथील दोन, तर अकोट, शिवाजी प्लॉट, रामदास पेठ, निमकर्डा व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. अकोलखेड ता.अकोट येथील चार, पिंपरी ता.अकोट येथील दोन आणि खांबोरा येथील दोन अशा आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

७५ वर्षीय महिलेचा मृत्यू
शनिवारी रात्री मूर्तिजापूर शहरातील तेलीपुरा भागातील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ६ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.

४१ जणांना डिस्चार्ज
कोरोनाचा संसर्ग होणाºयांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाºयांची संख्याही मोठी आहे. रविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना घरी सोडण्यात आले.

४८८ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३०१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २४१५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: CoronaVirus in Akola: 38 positive, 41 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.