CoronaVirus : अकोल्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०४३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 13:06 IST2020-07-17T13:04:46+5:302020-07-17T13:06:30+5:30
शुक्रवार, १७ जुलै आणखी १५ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २०४३ झाली आहे.

CoronaVirus : अकोल्यात आणखी १५ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २०४३ वर
अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. शुक्रवार, १७ जुलै आणखी १५ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या २०४३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी २९७ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ पॉझिटिव्ह असून, उर्वरित २७७ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व आठ पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा आणि पातूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, १६४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत २८१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.