Big Breaking : अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णाचा आयसोलेशन कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 10:36 IST2020-04-11T10:16:17+5:302020-04-11T10:36:00+5:30
कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

Big Breaking : अकोल्यात कोरोनाबाधित रुग्णाचा आयसोलेशन कक्षातच आत्महत्येचा प्रयत्न
अकोला : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना, अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचारार्थ दाखल असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. सदर रुग्णाबाबत शासनाकडून अधिक माहिती दिली जाणार आहे; मात्र सदर रुग्ण हा पातूरच्या नसल्याची माहिती आहे.
सर्वोपचार रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल कोरोनाच्या बाधित रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात एका कोरोना बाधित रुग्णाने शुक्रवारी रात्रीच गळ््याला ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, या संदर्भात तपास करत आहेत.