Corona Cases in Akola : आणखी तीन रुग्ण आढळले, तीन जण बरे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 17:57 IST2021-07-20T17:56:55+5:302021-07-20T17:57:00+5:30
Corona Cases in Akola: तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७७२४ झाली आहे.

Corona Cases in Akola : आणखी तीन रुग्ण आढळले, तीन जण बरे झाले
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट आता ओसरली असली, तरी दररोज काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवार, २० जुलै रोजी आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ५७७२४ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४३४ तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी बाळापूर व अकोट तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित ४३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सोमवारी करण्यात आलेल्या २६१ रॅपिड चाचण्यांमध्ये केवळ एक जण पॉझिटिव्ह आढळून आला.
४३ ॲक्टिव्ह रुग्ण
मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक तर आधार हॉस्पिटल येथील दोन, अशा एकूण तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता केवळ ४३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.