Corona Cases in Akola : ५६९ चाचण्यांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 17:59 IST2021-08-19T17:59:27+5:302021-08-19T17:59:33+5:30
Corona Cases in Akola: बोरगाव मंजू येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित निगेटिव्ह आहेत.

Corona Cases in Akola : ५६९ चाचण्यांमध्ये केवळ एक पॉझिटिव्ह
अकोला : कोरोनाचा विळखा सैल झाला असून, गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २४ तासांत करण्यात आलेल्या ५६९ चाचण्यांमध्ये (आरटीपीसीआर २३९ व रॅपिड ३३०) केवळ एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये बोरगाव मंजू येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३८ निगेटिव्ह आहेत. बुधवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ३३० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळून आले नाही.
१८ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत ५७८०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ११३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ५६६५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.