Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ६१ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 18:39 IST2021-06-17T18:39:47+5:302021-06-17T18:39:54+5:30
Corona Cases in Akola: गुरुवार, १७ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,११७ झाला आहे.

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू, ६१ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला असून, गुरुवार, १७ जून रोजी आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,११७ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये २२ अशा एकूण ६१ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५७,३२१ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७४१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित ७०२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी दिवसभरात हातोला ता. बार्शीटाकळी येथील ७३ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापूर- चार, बार्शीटाकळी-तीन, बाळापूर-पाच, तेल्हारा-दोन, अकोट-आठ, अकोला-१७. (अकोला ग्रामीण-सहा, अकोला मनपा क्षेत्र-११)
१०२ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात, उपजिल्हा रुग्णालय येथील एक, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील तीन, खासगी कोविड रुग्णालयांमधील २२, तर होम आयसोलेशन मधील ७० अशा एकूण १०२ जणांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,०५६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,३२१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,१४८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,११७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,०५६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.