Corona Cases in Akola : आणखी १८ जणांचा मृत्यू, ६७० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 19:16 IST2021-05-20T19:16:01+5:302021-05-20T19:16:06+5:30
Corona Cases in Akola: आणखी १८ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९७६ झाला आहे.

Corona Cases in Akola : आणखी १८ जणांचा मृत्यू, ६७० पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, २० मे रोजी आणखी १८ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९७६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५०३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये १६७ असे एकूण ६७० रुग्ण आढळून आल्याने, एकूण रुग्णसंख्या ५२,३१९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,९०३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २,४०० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कडोशी ता. बाळापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, कोथळी खु. बार्शीटाकळी येथील ६७ वर्षीय पुरुष, राजपुतपुरा येथील ५७वर्षीय पुरुष,काळेगाव ता. अकोला येथील ७६ वर्षीय पुरुष , अकोट येथील ६६ वर्षीय महिला, जुने शहर भागातील ६५ वर्षीय पुरुष, खदान येथील ३० वर्षीय पुरुष, पातुर येथील ६५ वर्षीय महिला, तापडीया नगर येथील ८० वर्षीय पुरुष, बार्शी टाकळी येथील ५५ वर्षीय महिला, अकोट येथील ५५ वर्षीय महिला, तारफैल येथील ७२ वर्षीय पुरुष, खिरपूर ता. बाळापूर येथील ६९ वर्षीय पुरुष, उमरी येथील ७६ वर्षीय महिला, पातुर येथील ७२ वर्षीय पुरुष, अकोट स्टॅण्ड अकोला येथील ५५ वर्षीय महिला, गोविंद नगर, अकोला येथील ६७ वर्षीय महिला व राऊतवाडी, अकोला येथील ७३ महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर- ९१ , अकोट- १२६, बाळापूर-३१, तेल्हारा-६०, बार्शी टाकळी-३५, पातूर-११, अकोला-१४९. (अकोला ग्रामीण-३६, अकोला मनपा क्षेत्र-११३)
५४६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ११, आर्युवेदिक महाविद्यालय येथील तीन, खासगी रुग्णालयातील ६२ आणि होम आयसोलेशन मधील ४६५ अशा एकूण ५४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,६५२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२,३१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ४४,६९१रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ९७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,६५२ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.