अकोला शहरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 21, 2014 22:34 IST2014-05-21T22:20:06+5:302014-05-21T22:34:07+5:30
दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठय़ाने नागरीक त्रस्त.

अकोला शहरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
अकोला - पम्पिंग मशीन नादुरुस्त, कान्हेरीनजीक पाईपलाईनमध्ये बिघाड, अशा एक ना अनेक कारणांमुळे संपूर्ण मे महिन्यात शहरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यातून प्रचंड दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी अकोलेकरांना मिळाल्याने हा पाणीपुरवठाही शहरवासीयांना त्रासदायकच ठरला. पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा आवश्यकतेपेक्षा अधिक वापर करण्यात आल्याने हे पाणी पिण्यासाठी तसेच वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
*आज पुन्हा झोन ४ मध्ये पाणीपुरवठा
आठ दिवसानंतर बुधवारी झोन ४ मध्ये पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र पाणी अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि दूषित असल्याने नागरिकांना या पाण्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे झोन ४ मध्ये गुरुवारी दुपारी पुन्हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा झोन १, २ व नंतर झोन ३ ला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.