शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

मारू ती कंपनीला ग्राहक न्यायमंचाचा दणका ; सात लाख पंचाहत्तर हजार रू पये ग्राहकाला देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 2:23 PM

अकोला: भारतातील अग्रगण्य कार निर्माता कंपनी मारू ति सुझुकी इंडिया लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अकोलाने दणका दिला आहे

ठळक मुद्देगाडीची किंमत ७ लाख ७५ हजार २२६ रुपये तसेच न्यायिक खर्च रक्कम ५ हजार रुपये द्यावेत, असा आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला .नीरज ललित वर्मा यांनी मारू ती स्विफ्ट डिजायर व्हीडीआय पीएसआयव्ही अधिक मायलेज देणारे वाहन ९ नोव्हेंबर २०१५ रोजी खंडेलवाल आॅटोव्हिल्स येथून रक्कम ७,७५,२२६ रुपयाला विकत घेतले. वारंवार विनंती करू नसुद्धा खंडेलवाल आॅटोव्हिल्सने वाहनाची दुरुस्ती करू न दिली नाही, यासाठी वर्मा यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: भारतातील अग्रगण्य कार निर्माता कंपनी मारू ति सुझुकी इंडिया लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच अकोलाने दणका दिला आहे. मारू ति स्विफ्ट डिजायर व्हीडीआय पीएसआयव्ही या वाहनात उत्पादित निर्मिती दोष वॉरंटी पिरीअडमध्ये कंपनीला दूर करता आले नाहीत. याकरिता निर्माता कंपनी मारू ति सुझुकी इंडिया पालम गुरगाव (हरियाणा), खंडेलवाल आॅटोव्हिल्स अकोला, मारू ति सुझुकी इंडिया विभागीय कार्यालय वरोवारी, पुणे यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदाराला त्याच्या गाडीची किंमत ७ लाख ७५ हजार २२६ रुपये तसेच न्यायिक खर्च रक्कम ५ हजार रुपये द्यावेत, असा आदेश अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला .या सोबतच तक्रारदाराची गाडी उभी असल्याचा कालावधीतील पार्किंग चार्जेस खंडेलवाल आॅटोव्हिल्सने तक्रारदाराकडून वसूल करू नये. आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून ४५ दिवसांच्या आत करावे. तसे न केल्यास मंचाने मंजूर केलेल्या संपूर्ण रकमेवर आदेश देत १५ मेपासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यंत दरसाल दर शेकडा १० टक्के व्याज वसूल करण्यास तक्रारदार पात्र राहील. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते, असे अंतिम आदेशात म्हटले आहे. हा आदेश न्यायमंच अध्यक्ष सुहास उंटवाले आणि सदस्य भारती केतकर यांनी दिला आहे.तक्रारदार कौलखेड येथील रहिवासी नीरज ललित वर्मा यांनी मारू ती स्विफ्ट डिजायर व्हीडीआय पीएसआयव्ही अधिक मायलेज देणारे वाहन ९ नोव्हेंबर २०१५ रोजी खंडेलवाल आॅटोव्हिल्स येथून रक्कम ७,७५,२२६ रुपयाला विकत घेतले. यानंतर खंडेलवाल आॅटोव्हिल्स कार्यालयात वाहनातील दोष दुरुस्तीकरिता दिली. कारण या वाहनात उत्पादित निर्मिती दोष होते; परंतु खंडेलवाल आॅटोव्हिल्सने वाहन दुरुस्तीचे भासवून व सुट्या भागाचे पैसे घेऊन दोष कायम दूर केले नाहीत. वाहन सर्व्हिसिंगला नेले असता वाहनातील दोष कायम होते. उलट व्हिल असेंब्लीमध्ये दोष असावा, तसे निरीक्षण करावे लागेल, असे सांगितले. कारण चाकामध्ये कर्कश आवाज वाहन ४० किलो मीटर वेगाने चालविल्यास येत होता. तक्रार करू नही खंडेलवाल आॅटोव्हिल्सकडून कधी एक टायर तर कधी दोन टायर बदलवून देतो, असे फोन येत होते; परंतु वाहन दुरुस्त करू न देण्याबाबत कधीही कळवत नव्हते.वाहनात असाधारण आवाज चाकातून येतो व त्यास खड्डे पडत आहेत. वाहन दुरुस्तीला आणले त्यावेळी ३७००० किलो मीटर इतकेच चालले होते. त्याचा वॉरंटीचा कार्यकाळ शिल्लक होता. वारंवार विनंती करू नसुद्धा खंडेलवाल आॅटोव्हिल्सने वाहनाची दुरुस्ती करू न दिली नाही, यासाठी वर्मा यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. तक्रारदार नीरज वर्मा यांच्यातर्फे न्याय मंचात अ‍ॅड़ मिलिंद सांबरे यांच्या मार्गदर्शनात अ‍ॅड़ अतुल सराग यांनी काम पाहिले. जिल्हा ग्राहक न्याय मंचने केवळ तक्रारदार ग्राहकाच्या बाजूने निर्णय दिला आहे. या निर्णयाविरुद्ध उच्चस्तरीय न्यायालयात आम्ही आव्हान देणार आहोत. ग्राहक न्याय मंचने वाहन तपासणीकरिता कोणतेही तज्ज्ञ मंडळ नियुक्त केले नव्हते.अलोक खंडेलवाल, खंडेलवाल आॅटोव्हिल्स, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाconsumerग्राहकCourtन्यायालयMaruti Suzukiमारुती सुझुकी