काँग्रेस- राकाँ आघाडीच्या निर्णयावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
By Admin | Updated: January 26, 2017 10:22 IST2017-01-26T10:22:08+5:302017-01-26T10:22:08+5:30
दोन्ही पक्षांच्या स्क्रिनिंग कमिटीची मुंबईत बैठक

काँग्रेस- राकाँ आघाडीच्या निर्णयावर उद्या शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
अकोला, दि. २५- अकोला महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करावी की एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करावे, याबाबत २७ जानेवारी रोजी मुंबईत निर्णय होणार आहे. दोन्ही पक्षांच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महापालिकेच्या दोन्ही निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. या आघाडीने स्वबळावर महापालिकेत सत्तासुद्धा हस्तगत केली होती. भाजप, सेनेला टक्कर देण्यासाठी दोन्ही पक्षांची आघाडी होणे गरजेचे असल्याचे दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांना वाटत असले तरी स्थानिक स्तरावरील दोन्ही पक्षातील नेत्यांची आघाडी नको असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान प्रदेशपातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत विचारमंथन सुरू झाल्याने पक्षङ्म्रेष्ठींचा निर्णय मान्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळेच आता आघाडी झाल्यास जागांचा फॉर्म्युला काय असावा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचा निर्णय २७ जानेवारी रोजी मुंबईत दोन्ही पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुंबईत होणार्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत शहरातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावून त्यांची मते विचारात घेण्यात येतील आणि त्यानुसार आघाडीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती सुत्रांनी दिली.