शाैचालय घाेळावर काँग्रेस नगरसेवकांचा टाहाे ; मनपाचा कानाडाेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:19+5:302021-01-23T04:18:19+5:30

महापालिकेत सत्ताधारी भाजपनंतर सर्वात माेठा पक्ष म्हणून अकाेलेकरांनी काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून दिले आहेत. अर्थातच विराेधी पक्षनेत्याची जबाबदारी काँग्रेसचे ...

Congress corporator's taha on toilet toilet; Corporation's Canada | शाैचालय घाेळावर काँग्रेस नगरसेवकांचा टाहाे ; मनपाचा कानाडाेळा

शाैचालय घाेळावर काँग्रेस नगरसेवकांचा टाहाे ; मनपाचा कानाडाेळा

Next

महापालिकेत सत्ताधारी भाजपनंतर सर्वात माेठा पक्ष म्हणून अकाेलेकरांनी काँग्रेसचे १३ नगरसेवक निवडून दिले आहेत. अर्थातच विराेधी पक्षनेत्याची जबाबदारी काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाच्या मनमानीवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी विराेधी पक्षनेत्यांची असताना मागील तीन वर्षांच्या कालावधीत साजीद खान यांनी महापालिकेच्या वर्तुळात साेयीपुरते राजकारण केल्याची खुद्द पक्षातील नगरसेवकांध्ये चर्चा रंगली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’अभियानच्या कामांमध्ये माेठ्या प्रमाणात अनियमितता झाली. २२ काेटींतून बांधलेल्या सिमेंट रस्त्यांचे पितळ अवघ्या सहा महिन्यांत उघडे पडले. केंद्र शासनाच्या २९ काेटींच्या निधीची उधळपट्टी करीत कागदाेपत्री १८ हजार शाैचालये बांधण्यात आली. पाणीपट्टी वसुलीचे कंत्राट देणाऱ्या एजन्सीने सर्वसामान्य अकाेलेकरांना अवाजवी देयकांचे वाटप केले. तसेच शहरातील मूलभूत सुविधा काेलमडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना विराेधी पक्षाची धुरा स्वीकारलेल्या काँग्रेसने प्रशासन व सत्तापक्षाच्या विराेधात आवाज उठविणे अपेक्षित असताना साेयीनुसार भूमिका घेतल्याचे समाेर आले आहे.

शिवसेनेच्या तक्रारी व पाठपुरावा

राज्यात सत्तापरिवर्तन हाेताच मनपात शिवसेनेने कात टाकल्याचे दिसून आले आहे. सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सत्तापक्षाच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेच्या कामकाजावर आक्षेप घेत शासनाकडे तक्रारी केल्या. तसेच पाठपुरावा करून शासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. प्रशासन व सत्तापक्षाच्या निर्णयावर केवळ टीका न करता शासनदरबारी मुद्दा रेटून धरण्याची सेनेची पध्दत लक्षात घेता मनपात शिवसेना प्रमुख विराेधी पक्षाच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Congress corporator's taha on toilet toilet; Corporation's Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.