शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा!

By admin | Updated: May 11, 2017 07:17 IST

जलसंधारण मंत्र्यांचे बैठकीत निर्देश

अकोला : गेल्या दोन वर्षांच्या काळानंतरही अपूर्ण असलेली जलयुक्त शिवार आराखड्यातील कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी नियोजन भवनमध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.यावेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे, आमदार सर्वश्री गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.२०१६-१७ वर्षात १२५ गावांमध्ये विविध यंत्रणेद्वारे ७९२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी एकूण १२.८४ कोटी रुपये निधी खर्च झाला. २०१५-१६ मध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेत खोलीकरण, रुंदीकरणाची ४७३ कामे करण्यात आली. त्यामध्ये ३४.६६ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला, तर सन २०१६-१७ या वर्षात ७३ कामांतून १२.३३ लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आला. चालू वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यास ३५०० शेततळ्यांचे लक्ष्यांक आहे. त्यापैकी ३८१ शेततळे पूर्ण झाली आहेत. ३५३ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. धरणे व जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ होण्यासाठी गाळ काढून शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरू केली. लघू पाटबंधारे तलाव, साठवण तलाव, गाव तलाव, पाझर तलाव इत्यादी ५० तलावांतील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे. त्यांना स्वखर्चाने वाहून न्यावा लागणार आहे. गाळ काढणाऱ्या यंत्रणेच्या इंधनाचा खर्च शासन करणार आहे. शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले.