शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

अकोट मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 14:07 IST

अकोला : अकोल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ असा आहे.

अकोला : अकोल्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा दरवेळी आमदार बदलणारा मतदारसंघ असा आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवारीसाठी सर्वच पक्षांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. आगामी निवडणुकीसाठी युती व आघाडी गृहीत धरून नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २००९ मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या या मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपाने स्वबळावर झेंडा फडकविला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने मतदारसंघावर दावा केला असल्यामुळे शिवसेनेतच उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू झाले तर काँग्रेसमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांची मोठी फळी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे चित्र आहे.या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत सेना, भाजपा स्वबळावर लढल्यानंतर भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी तब्बल ४२.३० टक्के मते घेऊन मिळविलेला विजय हा पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे प्राबल्य वाढविणारा ठरला आहे. खुद्द केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी जातीने लक्ष देत या मतदारसंघाची भक्कम बांधणी केली आहे. त्यामुळे सेनेपेक्षा भाजपा वरचढ ठरली असल्याने आता आगामी निवडणुकीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा, या मागणीसाठी सेनेतून दबाव निर्माण केला जात आहे.येथील मतदारांचा स्वभाव हा दरवेळी आमदार बदलण्याचा असल्याचे १९८५ नंतरच्या निकालांवरून अधोरेखीत होते. त्यामुळेच इच्छुकांचा आशा पल्लवीत झाल्या असून शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच आहे. शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे, तेल्हारा तालुका प्रमुख विजय मोहोड, वैद्यकीय सेलचे डॉ. विनीत हिंगणकर, दीलीप बोचे अशी प्रमुख नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. या मतदारसंघाची जबाबदारी सेनेने आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडे सोपविली असून, त्यांचेही अकोटमधील दौरे वाढले असल्याने तेसुद्धा अकोटात लढू शकतात, अशीही चर्चा आहे.या मतदारसंघात १९८५ मध्ये काँगे्रसचे सुधाकर गणगणे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला सलग सहाव्यांदा यश मिळविता आलेले नाही. त्यामुळे काँगे्रससाठी यावेळी अस्तित्वाची लढाई आहे. येथे काँग्रेसकडून महेश गणगणे, डॉ. संजीवनी बिहाडे, बाळासाहेब बोंद्रे, प्रा. संजय बोडखे यासह इतर नेतेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. काँग्रेसची परंपरागत मते या मतदारसंघात टिकून असली तरी या मतांना इतर मतांची जोड मिळवित विजयापर्यंत पोहोचण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणे सांभाळत इतर मतांवर प्रभाव टाकणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी, असा दावा सर्वच इच्छुकांकडून केला जात आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी वजाबाकी घडवून आणण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे. गेल्या दोन निवडणुकीतील मतांची तुलना केली, तर वंचित बहुजन आघाडीने (भारिप-बमसं) सरासरी ३० हजारांवर मते घेऊन तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. गेल्यावेळचा भारिप-बमसं आता ‘वंचितचा प्रयोग’ घेऊन रिंगणात उतरला असल्याने या पक्षाचे मनोबल उंचावले आहे. त्यामुळे या पक्षातही उमेदवारीसाठी स्पर्धा आहेच. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे व जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे या दोन प्रमुख उमेदवारांच्या नावाची चर्चा असली, तरी अंतिम निर्णय हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचाच असल्याने ते कोणती खेळी खेळतात, यावरही मत विभाजनाचे गणित ठरणार आहे. सध्या तरी सर्वच इच्छुकांनी झोकून देत मोर्चेबांधणी सुरू केली असल्याने उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

तेल्हारा तालुक्याच्या अस्मितेला फुंकर

अकोट या मतदारसंघात तेल्हारा व अकोट या दोन तालुक्यांचा समावेश होतो. ही दोन शहरे सोडली तर इतर भाग हा ग्रामीणच आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर प्रमुख पक्षांनी तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या नेत्यांना उमेदवारी देणे टाळलेच आहे. अपवाद फक्त बाळासाहेब तायडे यांचा. त्यामुळे यावेळी तेल्हारा तालुक्याला प्रतिनिधित्व द्यावे, अशी अस्मितेची फुंकर घातल्या जात आहे. या तालुक्यातील शिवसेना व काँग्रेसमधील इच्छुकांनी आपली दावेदारी प्रकट करताना हा मुद्दाही अधोरेखित केला आहे, हे विशेष. भाजपाच्या हाती सेनेचे भविष्यया मतदारसंघावर शिवसेनेने राज्य केले. हा इतिहासच सांगतो. १९९० नंतर शिवसेनेचे तब्बल चार आमदार निवडून आले आहेत. २०१४ मध्ये युती तुटल्यावर सेनेला आपले प्राबल्य टिकविता आले नाही. सेनेला अवघी १४ हजार २४ मते मिळाली. टक्केवारीमध्ये हे प्रमाण केवळ ८.४८ टक्के एवढेच आहे. त्यामुळे मागील इतिहासावर सेना या मतदारसंघावर दावा करीत असली तरी आता भाजपाचा वाढलेला जनाधार या दाव्यातील हवा काढून घेऊ शकतो. त्यामुळे सेनेच्या दाव्याचे भविष्य भाजपाच्याच हातात आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटPoliticsराजकारण