शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
3
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
6
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
7
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
14
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
15
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
16
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
18
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
19
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
20
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या आदेशाला उपायुक्तांचा ठेंगा

By admin | Updated: May 12, 2014 00:30 IST

मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याच्या आदेश

अकोला : शहराच्या मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याच्या आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशाला उपायुक्त डॉ.उत्कर्ष गुटे यांनी केराची टोपली दाखवली आहे. आयुक्तांचे लेखी आदेश प्राप्त होऊन अकरा दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. यामुळे कर्तव्यदक्ष म्हणून जनमानसात ओळख असलेले डॉ.उत्कर्ष गुटे अतिक्रमण हटवण्यासाठी नेमकी कोणती तयारी करीत आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. मनपाकडे लाखो रुपयांचा कर जमा करणार्‍या व्यापारी-व्यावसायिकांच्या दूकानांसमोरच फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यावर आधी दुकानासमोरील अतिक्रमण हटवा, त्यानंतर मालमत्ता कर जमा करतो, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. शिवाय रस्त्यालगतच अतिक्रमकांनी बाजार मांडल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. यासर्व बाबी लक्षात घेता, आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मुख्य मार्गावरील अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे आदेश उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांना जारी केले होते. आयुक्तांच्या आदेशावर अकरा दिवसानंतरही कारवाई होत नसल्याने कर्तव्यदक्ष डॉ.गुटे यांची कार्यप्रणाली पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यासंदर्भात डॉ.गुटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.