पांगरताटी येथे दि. १३ फेब्रुवारीला बंजारा संगीत भजनाचा कार्यक्रम भारतीताई राठोड (रा. वडवी) यांचा व मधुकर महाराज (रा. यवतमाळ) यांचा राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड, तर उद्घाटन आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला हिंमत महाराज, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार बळीराम सिरस्कार आदी उपस्थिर राहणार आहेत. तसेच जि.प.सदस्य लता पवार, विनोद देशमुख, संतोष सरदार, अर्चना राऊत, जि.प. सदस्य सुनील फाटकर, जि.प.सदस्य लक्ष्मी डाखोरे, नंदू डाखोरे, सुखनंदन डाखोरे, सरपंच पांगरताटी शिरीष जाधव, मुख्याध्यापक अशोक बदरखे आदी उपस्थित राहणार आहेत. दि. १४ फेब्रुवारीला कळस स्थापना व महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच दि. १५ फेब्रुवारीला मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रेमदास चव्हाण, विनोद जाधव यांनी दिली आहे.
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:18 IST