शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

स्वच्छता अ‍ॅपच्या सर्वेक्षणात अकोला शहर माघारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:56 PM

अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत

अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अ‍ॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अ‍ॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत. ४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला प्रारंभ केला असता विदर्भातील जिल्ह्यांमधील ११ शहरांना पहिल्या शंभर क्रमांकात स्थान नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अकोला महापालिका २५९ व्या स्थानावर असून, अमरावती महापालिक ा १३० व्या स्थानावर आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी यंदा केंद्राच्या चमूने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ५ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला ४ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, स्वच्छता अ‍ॅपच्या वापरासाठी ४०० गुण आहेत. स्वच्छता अ‍ॅप किती नागरिकांनी डाउनलोड केले, त्याचा किती जणांना वापर केला, अभिप्राय काय दिला, आदी घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४ हजार शहरांचे ‘डायनॅमिक रॅकिंग’ ठरविण्यात येते. ११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी स्वच्छता अ‍ॅपचा किती प्रमाणात वापर केला, नागरिकांच्या समस्यांचे प्रशासनाने निराकरण केले का व त्यानंतर तक्रारकर्त्याने काय अभिप्राय दिला, आदी घटकांसाठी ४०० गुण प्राप्त होतील. केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने ४ जानेवारीपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अमरावती महापालिका १३० व्या क्रमांकावर असून, अकोला महापालिका २५९ क्रमांकावर असल्याची माहिती आहे.केंद्राची चमू अकोल्यात!‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेंतर्गत तपासणीसाठी केंद्र शासनाची चमू मागील दोन दिवसांपासून शहरात दाखल आहे. शहरात तुंबलेल्या नाल्या, कचऱ्याचे ढीग पाहता ५ हजार गुणांपैकी मनपाला किती गुण प्राप्त होतील, हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका