सिटी बसची तोडफोड; चालक-वाहकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:34 IST2020-01-20T14:33:46+5:302020-01-20T14:34:10+5:30
शहर बसच्या चालक-वाहकास मारहाण करून बसची तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली.

सिटी बसची तोडफोड; चालक-वाहकास बेदम मारहाण
अकोला: शहरातील गोरक्षण - मलकापूर रोडवर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महानगरपालिकेच्या शहर बसच्या चालक-वाहकास मारहाण करून बसची तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या एमएच ३० एच ५४०७ क्रमांकाची एएमटी बसचे चालक सुधीर गुप्ता, वाहक सचिन खैरे प्रवाशांना घेऊन रेल्वे स्टेशन-गोरक्षण रोडवरून मलकापूरकडे जात होती. यादरम्यान एक वाहन चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करीत होता. याचदरम्यान त्या वाहनधारकाने बस थांबवून शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मलकापूर स्टेट बँकेजवळ तिघांना बोलावून पुन्हा मारहाण करून बसच्या काचेची तोडफोड केली. यासोबतच वाहकाची तिकाटाची मशीन तोडफोड करीत पैसे घेऊन फरार झाले. याप्रकरणी खदान पोलीस स्टेशनला अ