ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 04:03 PM2019-12-23T16:03:38+5:302019-12-23T16:03:45+5:30

नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांंचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रंगीबेरंगी विद्युुत रोषणाईने उजळून निघाली आहे.

christian prapare for Christmas : Market ready for christmas | ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

ख्रिस्ती बांधवांना नाताळचे वेध : प्रार्थनास्थळ, घरांवर रोषणाई;  बाजारपेठ सजली

Next

अकोला: ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील विविध चर्च तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळासाठी अकोल्याची बाजारपेठ सजली असून, १६० वर्षांंचा इतिहास असणारी अकोल्यातील खिश्चन कॉलनीदेखील आकाशदिवे, कंदील, रंगीबेरंगी विद्युुत रोषणाईने उजळून निघाली आहे.
प्रभू येशूंचा जन्मदिवस असलेला ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण मंगळवार, २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने सजवले जाणारे ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, गिफ्ट याचे लहानांसोबतच मोठ्यांनाही आकर्षण असते. अजूनही पालक लहान मुलांच्या उशाला त्यांचे आवडते गिप्ट ठेवतात आणि सांताक्लॉजच्या आठवणीत लहान मुले रंगून जातात. नाताळ आता दोन दिवसांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. शहरातील सर्व चर्चेसना आणि घरांना रंगरंगोटी व आकर्षक विद्युुत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील गांधीरोडवरील बाजारपेठेत लहान मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लॉॅजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लॉज टोपी, कपडे, चॉकलेटस, केकस, कॅडबरी, सजावटीचे साहित्य, रंगीबेरंगी मेणबत्या आणि डिझायनर जिंगल बेल्स दाखल झाल्या असून, त्यांच्या खरेदीसाठी ख्रिस्ती बांधवांची झुंबड उडाली असल्याचे दिसून येते.

ख्रिश्चन कॉलनीत झगमगाट
गेल्या आठवड्यापासूनच ख्रिस्ती बांधवांनी नाताळची तयारी सुरू केली. ख्रिश्चन कॉलनीतील घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे ख्रिश्चन कॉलनी सध्या प्रकाशाने उजळून निघाली आहे. या सणानिमित्त अकोल्यातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्हाभरातील मिळून सर्व सुमारे ३० चर्चेसमधून या सणाची तयारी झाली असून, येत्या दोन जानेवारीपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी कॅरोल पार्टी
मंगळवार, २४ डिसेंबरला रात्री या सर्व चर्चेसमधून कॅरोल पाटीर्चे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होऊन शेकडो अबालवद्ध घरोघरी जाऊन ख्रिस्तजन्माची गीते सादर करतील.  बुधवार २५ डिसेंबरला सर्व चर्चेसमधून सकाळी ख्रिसमसनिमित्त प्रार्थनासभा होतील. त्यानंतर आठवडाभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहील. त्याचदिवशी सायंकाळी अकोल्यातून ख्रिसमसनिमित्त भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. पुन्हा ३१ डिसेंबरला रात्री कॅरोल पार्टीद्वारे घरोघरी जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर केली जातील. अशाप्रकारे येत्या २ जानेवारीपर्यंत ख्रिश्चन धर्मीय नाताळ आणि नववषार्चा आनंद साजरा करतील.

 

Web Title: christian prapare for Christmas : Market ready for christmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.