काेराेनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने नाेव्हेंबर २०२०मध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याला परवानगी दिली. आता दुसऱ्या टप्प्यात बुधवारपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. शाळेत शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आले असून, मनपा शाळेतील २६८ शिक्षकांची चाचणी करण्यात आली. यादरम्यान, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
संमतीपत्र बंधनकारक
शाळेत दाखल हाेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
३०१४ विद्यार्थ्यांची उपस्थिती
उर्दू माध्यम -१७३८
मराठी माध्यम -८८७
हिंदी माध्यम -३८९
विद्यार्थ्यांना सॅनिटायजर, मास्क वाटप
शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सॅनिटायजर व मास्क वाटप करण्यात आले. तपासणीसाठी ऑक्सिमीटर व गन उपलब्ध करून दिल्या. शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी काही शाळांना भेटी दिल्या.