शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे भविष्य अधांतरी

By admin | Updated: February 28, 2015 02:19 IST

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम, चोहोट्टा, करोडी वीटभट्टय़ांवर बालकामगार.

नितीन गव्हाळे / अकोला: चौदा वर्षांखालील मुलांकडून काम करून घेणे हा बालकामगार कायद्यानुसार गुन्हा आहे; परंतु हा गुन्हा जिल्हय़ातील जवळपास सर्वच वीट्टभट्टय़ांवर घडतो आहे. खेळण्या, बागडण्याच्या, शिक्षण घेण्याच्या वयात कुटुंबाचा, पोटाचा भार उचलण्यासाठी म्हणा किंवा वीटभट्टी मालकांच्या गरजेपोटी या कोवळय़ा मुलांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून येते. शुक्रवारी लोकमत चमूने गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, गोपालखेड, करोडी, दहीहांडा परिसरातील वीटभट्टय़ांवर स्टिंग ऑपरेशन केले. स्टिंग ऑपरेशनदरम्यान या सर्वच वीटभट्टय़ांवर १४ वर्षाखालील आणि त्यावरील वयोगटातील मुले विटांचा भार वाहून नेताना दिसून आली. बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असला तरी वीटभट्टय़ांवर हा गुन्हा दररोज घडतो आहे. चोहोट्टा बाजार परिसरातील वीटभट्ट्यांवर धारणी, मेळघाटामधील आदिवासी कुटुंब कामास आहेत. आदिवासी कुटुंबातीलही मुलांना त्यांचे आई-वडील म्हणा किंवा वीटभट्टी मालकाच्या आग्रहावरून कामावर ठेवल्या जाते. बालवयात मुलांच्या हाती पाटी, पेन्सिल द्यायला हवी. तेथे त्यांच्या हातात घमिले आणि फावडे दिल्या जाते. त्यांच्या पाठीवर दप्तराच्या ओझ्याऐवजी डोक्यावर विटांचे घमिले दिले जात असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. शहरामध्ये मोर्णा नदीच्या काठावरील वीटभट्टय़ा, जिल्हय़ातील गांधीग्राम, चोहोट्टा बाजार, करोडी, दहीहांडा, अंदुरा, बाळापूर आदी ठिकाणच्या वीटभट्टय़ांवर शेकडो बालकामगार डोक्यावर विटा उचलताना दिसून येतात. परंतु या वीट्टभट्टय़ांवरील बालकामगारांची सुटका करण्यात शासनाचा बालकामगार विभाग तर सोडाच महिला व बालकल्याण विभाग, बालकल्याण समिती, चाइल्ड लाइन, पोलीस सर्वच उदासीन आहेत. त्यामुळे बालकामगार कायदा केवळ कागदावरच उरला असल्याचे दिसून येते. या संदर्भात साहाय्यक कामगार आयुक्त एस.जी. मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालकामगारांच्या सुटकेसाठी विशेष कृती दल कार्यरत असल्याचे सांगीतले. कृती दलामार्फत आम्ही बाळापूर, चोहोट्टा येथील वीटभट्टीवर दोन बालकांची सुटका केली. कारवाईनंतर आम्ही वीटभट्टी मालकांकडून बालकांना कामावर न ठेवण्याचे हमीपत्र लिहून घेतो. तसेच तहसीलदारांना बालकांना कामावर ठेवणार्‍या वीटभट्टीस परवानगी देऊ नये, असे पत्र देतो. जिल्हय़ात कुठेही बालकामगार असल्याची तक्रार आल्यास आम्ही कारवाई करतो, असे त्यांनी सांगीतले.