शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

‘साडेसाती’च्या फे-यात अडकली बालके

By admin | Updated: November 14, 2014 01:10 IST

बालकदिन विशेष, दिवसाला होते ३00 ते ४00 रुपयांची कमाई

राम देशपांडे /अकोला

      इतरांच्या कुंडलीतील शनीची साडेसाती दूर करण्यासाठी शनिमंत्राचा जाप करून दान-दक्षिणा गोळा करणार्‍या बालकांचे प्रमाण अलिकडच्या काही वर्षांमध्ये वाढत चालले आहे. यात ग्रामीण भागातील बालकांचा भरणा अधिक असून, आर्थिक चणचण दूर करण्याच्या उद्देशाने दर शनिवारी व अमावस्येला शहरात वणवण फिरणारी ही बालके स्वत: मात्र दुर्दैवाच्या साडेसातीच्या फेर्‍यात अडकत चालली आहेत. शनी आणि मंगळ हे दोन ग्रह पृथ्वीपासून अब्जावधी मैल अंतरावर असले तरी शनीची साडेसाती व पत्रिकेतील मंगळ असल्याचे सांगताच भलीभली हबकून जातात. शनीच्या साडेसातीला सारेच वचकून असल्याने, त्याला प्रसन्न करण्यासाठी भक्तमंडळीकडून शनी मंदिरांमध्ये उडीद व तेलाचा अभिषेक केला जातो. दारोदार फिरून दान-दक्षिणा गोळा करण्याची प्रथा याच धार्मिक भावनेतून रूढ झाली असावी कदाचित! शनिमंत्राचा जाप करीत दारोदारी दान-दक्षिणा गोळा करणार्‍यांमध्ये १८ वर्षांखालील बालकांचा अधिक समावेश असून, यात ग्रामीण भागातील बालकांचा भरणा अधिक असल्याचे दिसून येत आहे. अकोला शहरात अशा पद्धतीने दान-दक्षिणा गोळा करणार्‍या बालकांशी संवाद साधला असता, दिवसाला ३00 ते ४00 रुपये पदरी पडत असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट झाले. मिळालेल्या पैशातून स्व:च्या आर्थिक गरजा भागविण्याकडे त्यांचा सर्वाधिक कल दिसून आला. जवळपास सर्वांच्या कुटुंबीयांना आपलं मूल अशा पद्धतीने दान-दक्षिणा मागून आणत असल्याचे माहीत असल्याने, कुटुंबात कुणीही रोकटोक करणारे नसल्याने, नकळत खेळण्या-बागडण्याच्या वयातल्या या बालकांचं शैक्षणिक भविष्य अंधारात ओढले जात आहे. एकीकडे मंगळावर यान धाडणार्‍या या देशाचं भवितव्य, अर्थात ही लहान बालकेच शनीच्या साडेसातीच्या फेर्‍यात अडकत चालली आहेत.