शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना; लाभार्थी हिस्सा भरावा लागणार कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 4:19 PM

अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे.

अकोला: शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे दिवसाही वीज पुरवठा उपलब्ध करून देणाºया मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील लाभार्थींना त्यांच्या हिश्शाची भरावी लागणारी रक्कम आता कमी करण्यात आली आहे.शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मान्यता दिली. त्यानंतर या निविदेद्वारे निश्चित झालेली कृषी पंपाची किंमत ३ एचपी डीसीसाठी १ लाख ६५ हजार ५९४ व ५ एचपी डीसीसाठी २ लाख ४७ हजार १०६ एवढी आहे. ही रक्कम पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याने शेतकºयांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी ३ एचपी डीसी पंपासाठी आधारभूत किंमत २ लाख ५५ हजार व ५ एचपी डीसी पंपासाठी ३ लाख ८५ हजार होती.सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना पूर्वी ३ एचपीसाठी २५ हजार ५०० (१० टक्के) तर अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थींना १२ हजार ७२५ एवढी रक्कम भरावी लागत होती. ती रक्कम आता अनुक्रमे १६ हजार ५६० व ८ हजार २८० एवढी भरावी लागणार आहे, तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना पूर्वी ३८ हजार ५०० (१० टक्के) तर अनुसूचित जाती-जमाती गटातील लाभार्थींना १९ हजार २५० एवढी रक्कम भरावी लागत होती. आता अनुक्रमे २४ हजार ७१० व १२ हजार ३५५ एवढी रक्कम भरावी लागणार आहे.६४ हजार ९३८ शेतकºयांचे अर्जज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, तसेच ज्या शेतकºयांनी यापूर्वी कृषी पंपांसाठी वीज जोडणी घेतली नाही किंवा वीज जोडणीचे पैसे भरून त्यांची वीज जोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यभरातील सुमारे ६४ हजार ९३८ शेतकºयांचे अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ हजार ०१६ शेतकºयांना कोटेशनही देण्यात आले आहे.‘आपल्या दारी’ योजनेतील लाभार्थींनाही मिळणार वीज जोडणी!महावितरण आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ज्या शेतकºयांना केबलद्वारे वीज पुरवठा देण्यात आला होता, अशा शेतकºयांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीज पुरवठा देण्याबाबत मागणी आल्याने त्यांनाही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत आॅनलाइन अर्ज करून सहभागी करून घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmahavitaranमहावितरण