फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारात विषमता दूर करण्याचे सार्मथ्य - छत्रपती संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:48 AM2018-01-12T01:48:45+5:302018-01-12T01:49:35+5:30

अकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विषमता दूर करायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसह, फुले-शाहू-आंबेडकर समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले. त्यांचे हस्ते  गोरक्षण मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याच्या स्थानांतरण सोहळा थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते. 

Chhatrapati Sambhaji Raje - The ability to remove the inequality in the consideration of Phule-Shahu-Ambedkar | फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारात विषमता दूर करण्याचे सार्मथ्य - छत्रपती संभाजी राजे

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारात विषमता दूर करण्याचे सार्मथ्य - छत्रपती संभाजी राजे

Next
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे थाटात स्थानांतरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वराज्यच नव्हे, तर सुराज्य निर्मितीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भर होता. म्हणून छत्रपतींवर देशभरातील जनतेचे प्रेम आहे. केवळ मराठय़ांना घेऊन छत्रपती एकत्र आले नाही, अठरापगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना घेऊन ते पुढे आले. समाजातील विषमता दूर करायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसह, फुले-शाहू-आंबेडकर समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले. त्यांचे हस्ते  गोरक्षण मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याच्या स्थानांतरण सोहळा थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते. 
खा. संभाजी राजे म्हणाले की  कोरेगाव-भीमासारख्या घटनांमुळे होणार्‍या राज्यातील दंगली निंदनीय आहेत. केवळ जयजयकार करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आपण महान थोर-पुरुषांचे विचार समाजापर्यंत खरेच पोहोचवित आहोत का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचा केवळ जयजयकार न करता त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अनेकांना नाही,ती  माहिती नवीन पिढीला मिळेल, यासाठी पुढाकार घ्या, फुले-शाहू-आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराजांच्या विचारांचे एक रिसर्च सेंटर उघडा, यासाठी मी माझ्या खासदार निधीतून  देईन, अशी घोषणाही त्यांनी केली. 
रायगड प्राधिकरणासाठी ६0६ कोटी रुपयांचा निधी आला असून, प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५0 गड-किल्ल्यांपैकी पाच मॉडेल कि ल्ल्यांचे काम हाती घेतले आहेत. ते लवकरच सुरू होईल.अशी माहिती त्यांनी दिली.
गुरुवारी सकाळी ११.३0 वाजता सुरू झालेल्या या स्थानांतरण सोहळ्याला शिवशाहीचे रूप आले होते. संकल्पच्या पारंपरिक ढोल-ताशांनी राजेंचे स्वागत करण्यात आले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहकार नगर शिवस्मारक समितीच्या पदाधिकार्‍यांनी ताम्रपत्र देऊन राजेंचे आगळ-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले. प्रास्ताविक पंकज जायले यांनी केले. राजेंच्या हस्ते स्मारक समितीमधील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सुधाकर खुमकर यांनी, तर आभार रुमाले गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमाला शरद कोकाटे, तुषार जायले, विनायक पवार, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, मार्तंडराव माळी, पंकज साबळे, प्रदीप गुरुखुद्दे, राजेंद्र पातोडे, प्रा. मधू जाधव, गजानन देशमुख, किनगे, मंगेश काळे, सुरेंद्र विसपुते, राम गव्हाणकर, मंगेश कक्कड, रवीभाऊ वैराळे, खाडे, राजू राठोड, किरण चौरे, ठाणेदार संतोष महल्ले, योगेश गुलाई, बी.एस. देशमुख, चंद्रशेखर शेळके, नितीन दांदळे, अमित ठाकरे, गोपी चाकर, विजय साबळे, पुरुषोत्तम आवारे, मयूर विखे, मनोज आखरे, सुभाष बनकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सहकार नगरचा स्थानांतरण सोहळा नियोजित असताना स्थानांतरणाच्या ठिकाणाजवळ राहणारे  नामदेव दांदळे या सामाजिक कार्यकर्त्याचे बुधवारी रात्री निधन झाले; मात्र स्थानांतरण सोहळा रद्द न करण्याचे याच परिवाराने सांगितले. दांदळे परिवाराच्या या निर्णयाचे खासदार राजे संभाजी यांनी कौतुक केले आणि त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामूहिक श्रद्धांजलीदेखील अर्पण करण्यात आली.
 

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje - The ability to remove the inequality in the consideration of Phule-Shahu-Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.