शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

चेन स्नॅचिंग प्रकरणातील सैनिकासह सहकाऱ्याची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:42 PM

अकोला: शहरातील व शेगाव येथील चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केलेला सैनिक मंगेश इंदोरे व त्याचा सहकारी मिलिंद डाबेराव (रा. कोळासा) यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

अकोला: शहरातील व शेगाव येथील चेन स्नॅचिंग प्रकरणात अटक केलेला सैनिक मंगेश इंदोरे व त्याचा सहकारी मिलिंद डाबेराव (रा. कोळासा) यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. दोघाही आरोपींना इतर ठिकाणच्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पोलीस ताब्यात घेणार आहेत.बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील राहणारा मंगेश गजानन इंदोरे हा गत काही वर्षांपासून सैन्यदलात कार्यरत आहे. तो सुटीवर गावी आला, की गावातील त्याचा सहकारी मित्र मिलिंद गजानन डाबेराव याच्या मदतीने शहरांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करायचा आणि पळून जायचा. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लुटले होते. त्यानंतर त्याने शेगाव येथेसुद्धा असे तीन गुन्हे केले होते. यासोबतच मूर्तिजापूर भागातही त्यांनी गुन्हे केलेले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगेश इंदोरे, मिलिंद डाबेराव यांना ताब्यात घेतले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांना अटक केली होती. तीन डिसेंबरपर्यंत दोघेही पोलीस कोठडीत होते. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस आणायचे असल्याने, पोलिसांनी त्यांना पुन्हा कारागृहातून अटक करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस