सव्वा लाखाची सोनसाखळी घेऊन चोरटे पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 17:39 IST2020-10-31T17:35:21+5:302020-10-31T17:39:43+5:30
Akola Crime News एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेली.

सव्वा लाखाची सोनसाखळी घेऊन चोरटे पळाले
अकोला : तूकाराम चौक ते कौलखेड रस्त्याने जात असलेल्या महिलेची सुमारे सव्वा लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तुकाराम चाैकातील संताेष नगर येथील रिहवासी नयना अनंत खर्चे (वय ४४) त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत संध्याकाळी साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे तुकाराम चौक ते कौलखेड रस्त्याने फिरत होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी नकळत नयना खर्चे यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली. ही घटना स्टेट बँकेच्या एटीएम समोर घडली. या प्रकरणी नयना यांनी खदान पाेलीस ठाणयात तक्रार िदली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत