सीसीआय चे जिल्ह्यतआणखी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:57 IST2020-04-28T17:57:48+5:302020-04-28T17:57:54+5:30
, २९ व ३० एप्रिल रोजी आणखी काही जिनिग प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे.

सीसीआय चे जिल्ह्यतआणखी कापूस खरेदी केंद्र सुरू होणार
अकोला : भारतीय कापूस (सीसीआय) महामंडळाने जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, २९ व ३० एप्रिल रोजी आणखी काही जिनिग प्रेसिंगमध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ४० टक्के कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक होता. तथापि, ताळेबंदीमुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली होती; परंतु २० एप्रिलपासून शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यास मुभा देण्यात आल्याने जिल्ह्यात कापूस खरेदी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. खरीप हंगामातील मशागत, कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्यामुळे शेतकºयांना अडचण येणार नाही, असा यामागील उद्देश आहे. त्यामुळे सीसीआय आणखी खरेदी केंद्र सुरू करीत आहे.