सावकारी प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 26, 2017 10:38 IST2017-01-26T10:20:56+5:302017-01-26T10:38:41+5:30

उरळ पोलिसांनी हातरुण, जुना अंदुरा, खिरपुरी व अकोला येथील एकूण आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

A case against eight people in the Savar case | सावकारी प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सावकारी प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

उरळ (अकोला), दि. २५-: नजीकच्या हातरुण, जुना अंदुरा व निमकर्दा येथील चार शेतकर्‍यांची शेतजमीन गहाण व्यवहाराच्या नावाखाली हडप केल्याच्या तक्रारप्रकरणी बाळापूर येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) यांच्या लेखी पत्रावरून त्यांच्याच कार्यालयातील सहायक सहकारी अधिकारी दिलीप दामोदर गोपनारायण यांनी चौकशी अंती दाखल केलेल्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी हातरुण, जुना अंदुरा, खिरपुरी व अकोला येथील एकूण आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ च्या ३९ कलमान्वये २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
हातरूण येथील कलंदरखा एजाजखा रा.हातरुण, फुलचंद जयदेव पाटील रा. जुना अंदुरा, दुर्गाबाई माणिक तायडे रा.जुना अंदुरा व गजानन भुलाजी इंगळे रा. निमकर्दा यांनी त्यांची जमीन सावकारांनी हडपल्याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून बाळापूरचे सहायक निबंधक (सहकारी संस्था ) यांच्या लेखी पत्रावरून सहायक सहकारी अधिकारी दिलीप गोपनारायण यांनी याप्रकरणी चौकशी केली. त्या चौकशीत शेतजमीन गहाण प्रकरणात अवैध सावकारी व्यवहार झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दिलीप गोपनारायण यांनी सिलेमानशाह तुरकशाह रा. हातरुण, मोहसीनशाह लुकमानशाह रा. हातरूण , गजानन लक्ष्मण काळे रा. शुक्रवारपेठ वाशिम, केशव तुळशिराम भगत रा. जुना अंदुरा, देवीदास भीमराव उबाळे रा. खिरपुरी, सुनील जयंतराव बावस्कर रा. अकोला, विजयकुमार मायाप्रसाद तिवारी रा. अकोला व नरेंद्र प्रमोद पंचाली रा. अकोला या आठ आरोपींविरुद्ध २४ जानेवारीपूर्वी अवैध सावकारी व्यवहार केला असल्याबाबत उरळ पोलीस स्टेशनमध्ये २४ जानेवारी रोजी रीतसर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून उपरोक्त आठही आरोपींविरुद्ध उरळ पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमाच्या कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय कुंभार, जमादार दादाराव लिखार, पोलीस नाईक विजय चव्हाण, एएसआय हरिदास काळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: A case against eight people in the Savar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.