शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रमाची तयारी असेल तर ‘किचन’ मध्ये करिअर

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या तरुणाईला टिप्स.

बुलडाणा : कर्तृत्वापुढे गगन ठेंगणे असे म्हटले जाते. त्यामुळे तुमच्यामध्ये क्षमता असेल, परिश्रम करण्याची तयारी असेल तर किचन मध्ये करिअर करण्यासाठी पुढे या, असे आवाहन प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी तरुणाईला केले. लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी ते बुलडाण्यात आले असता त्यांनी लोकमत कार्यालयात संवाद साधला.प्रश्न : या क्षेत्रात कसे आलात, वारसा होता का ?वारसा नाही, माझा कल कलाक्षेत्राकडे अधिक होता. आई संगीत शिक्षिका, त्यामुळे तिला मी त्यांच्या क्षेत्रात यावे, असे वाटायचे; मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्याची आवड सर्वाधिक; परंतु खाताखाता मी हे पदार्थ बनवेल, असे कधी वाटले नाही. कलेची आवड असल्याने मी लग्नामध्ये नवरदेव-नवरीची थर्माकोलची नावे कापण्याचे काम सुरू केले. पन्नास रुपये मिळायचे व लग्नात जेवायलाही मिळायचे. त्यामधून मग एका कॅटरिंगवाल्यासोबत मैत्री झाली. त्याला मदत करायला लागलो. त्यामधून बरेच शिकता आले व पुढे करिअर म्हणून याच क्षेत्रात उतरलो.प्रश्न :गुरू कोण, शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले का ?प्रशिक्षण कुठेच घेतले नाही. कॅटरिंगवाल्यासोबत काम करताना एकदा त्याच्यासोबत वाद झाला व त्याच्या जिद्दीवर मी माझ्या एका मित्राच्या भावाच्या लग्नाचे रिसेप्शनचे काम घेतले. २५0 लोकांचे जेवण तयार करून घेतले. कार्यक्रम यशस्वी झाला त्यामुळे हुरूप वाढला. या क्षेत्रात काम करायचे ठरविल्यावर आपल्याला पदार्थ आले पाहिजेत ही भावना प्रबळ झाली त्यामुळे मग मी शिकत गेलो. शेकडो गुरू आहेत. अनेकांकडून विविध पदार्थ बनविण्याची कला शिकलो.प्रश्न : करिअर म्हणून या क्षेत्रात किती संधी आहे?खूप मोठी संधी आहे. फक्त मेहनत करण्याची तयारी हवी. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून सुटाबुटात मॅनेजर होण्यापेक्षा किचनमध्ये या. येथे काम करण्यास खूप स्कोप आहे. अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ज्ञान व कौशल्यामधून त्या पदार्थाची चव व स्वरूप बदलू शकता. आजच्या काळात या व्यवसायात अनेक संधी आहेत. दररोज नवनवीन हॉटेल्स तयार होतात. जोपर्यंत मानवाचे खाण्यावर प्रेम आहे तोपर्यंत हा व्यवसाय अजरामर आहे. आता या व्यवसायाला ग्लॅमर मिळाले आहे; मात्र यामागची मेहनत मोठी आहे. ती समजून घेणे गरजेचे आहे.प्रश्न : महिलांपेक्षा पुरुषांना ह्यशेफह्ण म्हणून लोकप्रियता कमी आहे का ?असे म्हणता येणार नाही; मात्र महिला शेफ यांचे प्रमाण कमी आहे हे सत्य आहे. आपल्या घरात अतिशय सुगरण असणार्‍या अनेक गृहिणी आहेत; मात्र घरी करणे, आवड आहे म्हणून पदार्थ करणे व व्यवसाय म्हणून या क्षेत्रात काम करणे यामध्ये खूप अंतर आहे. कदाचित त्यामुळेच ह्यशेफह्ण म्हणून महिला कमी आहेत, असे मला वाटते. कदाचित काही वेगळी कारणे असतील तर शोध घेतला पाहिजे.प्रश्न : हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणामध्ये काही बदल व्हावे असे वाटते का ?हो ! अजूनही हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षणात प्रादेशिक पदार्थ शिकविले जात नाहीत. अभ्यासक्रमात असलेल्या रेसिपी वर्षानुवर्ष तशाच आहेत. यामध्ये आता नावीन्य आले पाहिजे. प्रादेशिक पदार्थांना स्थान दिले पाहिजे. त्यामुळे आपल्याकडच्या रेसिपींनाही ग्लॅमर मिळेल.