पातूर-वाशिम मार्गावर भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:12 IST2018-04-05T14:12:09+5:302018-04-05T14:12:09+5:30
पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली.

पातूर-वाशिम मार्गावर भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडले
पातूर (जि. अकोला): वाशिम येथून अकोल्याकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या भरधाव बसने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना गुरुवार, ५ एप्रिल रोजी पातूर-वाशिम मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ दुपारच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश हरिश कुटे (२७, पांगरी कुटी ता. मालेगाव जि. वाशिम) असे आहे.
राज्य परिवहन महामंडळाची एमएच १४ बीटी ४२९५ क्रमांकाची बस वाशिम येथून अकोल्याकडे जात होती. यावेळी वाशिम जिल्ह्यातील पांगरी कुटे येथील योगेश हरीश कुटे हे त्यांच्या एम एच ३७ एस २७९३ क्रमांकाच्या दुचाकीने शेगावला जात होते. चिंचखेड फाट्याजवळ बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व त्याने योगेश कुटे यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश कुटे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
मृतकाचा भाऊ गंगेश हरिष कुटे (२२) याने पातूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून बसचा चालक प्रभू जनार्धन इंगळे रा. अकोला वाशीम बायपास याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी बस पोलीस स्टेशनला आणून उभी करण्यात आली आहे. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.