राष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 20:59 IST2017-11-08T20:52:24+5:302017-11-08T20:59:11+5:30
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणा-या राष्ट्रीय महामार्गावर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी वाशिंब्यानजीक ट्रक व राज्य परिवहन महामंडळ व बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला.

राष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात!
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणा-या राष्ट्रीय महामार्गावर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी वाशिंब्यानजीक ट्रक व राज्य परिवहन महामंडळ बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला.
कारंजा आगाराची बस क्रमांक एमएच ४० वाय ५३२९ बस बुधवारी प्रवाशांची वाहतूक करीत असताना तिच्यासमोर एमपी २० एचबी ६९८४ क्रमांकाचा माल वाहतूक ट्रक धावत होता. समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबून वेग कमी केल्याने पाठीमागून धावणारी बस ट्रकवर धडकली. यावेळी बसचालकाने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाच्या साइडने बस ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले, तसेच बसचालक तोटे जखमी झाले. या घटनेनंतर सदर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच हे.काँ. दीपक कानडे, भागवत कांबळे यांनी घटना ठिकाणावर जाऊन पंचनामा केला व जखमी चालकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, काही काळ महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत.