Burglary at Balapur; Lampas stole Rs 98,000 | बाळापूर येथे घरफोडी; ९८ हजारांचा ऐवज लंपास

बाळापूर येथे घरफोडी; ९८ हजारांचा ऐवज लंपास

ठळक मुद्दे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून ऐवज लंपास केला.

बाळापूर: शहरातील लोटणापूर भागात राहणाऱ्या एका महिलेचे चोरट्यांनी घर फोडून सोने व नगदी ७० हजार रुपये, असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौसल विष्णू हिवराळे ह्या २२ नोव्हेंबरपासून बाहेरगावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याची अंगठी, डोरले, सोन्याचे चार मणी अंदाजे किंमत २८,५०० रुपये व नगदी ७० हजार रुपये, असा ऐकूण ९८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दिलेल्या फिर्यादीवरून बाळापूर पोलिसांनी भादंविच्या ३८०, ४५७ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Burglary at Balapur; Lampas stole Rs 98,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.