लाचखोर लिपिक अटकेत
By Admin | Updated: January 22, 2016 01:45 IST2016-01-22T01:45:30+5:302016-01-22T01:45:30+5:30
तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक.

लाचखोर लिपिक अटकेत
बुलडाणा: थकीत देयक काढण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलडाणा येथील भविष्य निर्वाह निधी अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी २१ जानेवारी रोजी रंगेहात पकडले. लोणार तालुक्यातील खळेगाव येथील वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक संजय किसन चोंडेकर यांचे जानेवारी ते डिसेंबर २0१५ पर्यंत १ लाख ४७ हजार रुपये वेतन थकीत होते. थकीत देयक काढण्यासाठी चोंडेकर यांनी बुलडाणा येथील भविष्य निर्वाह निधी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क केला. यासाठी तेथील वरिष्ठ लिपिक प्रशांत ढेरे यांनी त्यांच्याकडे तीन हजारांची मागणी केली होती. सदर प्रकाराची तक्रार चोंडेकर यांनी लाचलुचपत विभागाला दिली. दरम्यान, आज सायंकाळी संगम चौकातील होटल गोपालमधे अधिकार्यांनी सापळा रचून डेरे याला लाच घेताना रंगेहात पकडले.