मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 11:06 IST2020-08-28T11:06:47+5:302020-08-28T11:06:57+5:30

मुलाने वृद्ध आईस मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार गुरुवारी समोर आला.

The boy beat the old mother and kicked her out of the house! | मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले!

मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले!

लोकमत न्यूज नेटवर्क
निहिदा: शेती नावावर करून देण्याच्या वादातून मुलाने वृद्ध आईस मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. आईच्या तक्रारीनुसार पिंजर पोलिसांनी मुलासह दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
पोटच्या मुलाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले, वाढविले. काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केले. तोच मुलगा आज आईच्या जीवावर उठला आहे. शेतीच्या वादातून मुलगा सुदर्शन तायडे असे या मुलाचे नाव आहे त्याने आई लक्ष्मीबाई रमेश तायडे(६0) हिच्यासोबत बुधवारी भांडण केले. शेती नावावर करून दे आणि ५0 हजार रुपयांच्या मागणीसाठी त्याने जन्मदात्या आईला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाहीतर मारहाण करून तिला घराबाहेर हाकलून दिले. ही घटना पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत डापकी येथे घडली. लक्ष्मी तायडे यांच्या तक्रारीनुसार मुलगा सुदर्शन तायडे हा व्यसनी असून, सतत पैशांसाठी तगादा लावतो. तसेच दीर गणेश तायडे हा सुद्धा त्रास देतो. शिवीगाळ करतो. तक्रारीनुसार पिंजर पोलिसांनी सुदर्शन तायडे व गणेश तायडे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

 

Web Title: The boy beat the old mother and kicked her out of the house!