काटेपूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:20 IST2020-09-18T18:19:59+5:302020-09-18T18:20:16+5:30

चा मृतदेह गोपालखेडजवळ आढळला.

The body of a youth who was swept away in the floods of Katepurna river was found | काटेपूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

काटेपूर्णा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

मूर्तिजापूर: तालुक्यातील भटोरी येथील २२ वर्षीय युवक पूर्वेश सुभाष हेंडजकर हा १७ सप्टेंबर रोजी दुपारी काटेपूर्णा नदीकाठावर गुरे चारत होता. तो नदी पात्रात उतरला असताना, पुरात वाहून गेला. अखेर शुक्रवारी सर्च आॅपरेशनंतर त्याचा मृतदेह गोपालखेडजवळ आढळला.
पूर्वेश हेंडजकर हा युवक काटेपूर्णा नदीपात्राकाठी असलेल्या गायरानात गुरे चारत असताना काटेपूर्णा नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची माहिती नातेवाइकांनी दिल्यावर तहसीलदार जाधव यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली. १७ सप्टेंबर रोजी दुपारपासून शोधमोहीम राबविली; परंतु अंधार पडल्याने रात्री सर्च आॅपरेशन थांबविण्यात आले. शुक्रवारी पुन्हा सकाळपासून भटोरीजवळून सर्च आॅपरेशन चालू केले असता, पारदजवळील घुंगशी बॅरेजनजीक रेस्क्यु बोट पोहोचली असता, गांधीग्रामवरून एक मृतदेह वाहून जात असल्याची माहिती दीपक सदाफळे यांना मिळताच, त्यांनी गांधीग्राम येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा गांधीग्रामचे संजय मांजरे यांना माहिती दिली. त्यांनी गोपालखेडकडे मृतदेह वाहून जात असल्याचे सांगितले. संजय मांजरे यांनी ज्ञानेश्वर म्हसाये, विठ्ठल, लखन धुरदेव यांना पाठवून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.

 

Web Title: The body of a youth who was swept away in the floods of Katepurna river was found