अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
By Admin | Updated: May 15, 2014 19:50 IST2014-05-15T18:05:59+5:302014-05-15T19:50:46+5:30
रिधोरा येथे काटेरी झुडपांमध्ये ७० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला
रिधोरा : बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथे काटेरी झुडपांमध्ये ७० वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. महामार्गावरील रिधोराजवळील पेट्रोल पंपाच्या मागे झुडपांमध्ये आढळून आलेल्या मृतकाचा रंगा काळा सावळा असून, त्याच्या अंगावर केवळ पँट आहे. त्याची दाढीही वाढलेली आहे. सदर इसम काहीवेळा रिधोरा गावात आढळून आल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतकाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.