संशयास्पदरीत्या आढळला वृध्दाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:31 IST2020-05-06T16:31:04+5:302020-05-06T16:31:26+5:30
६० ते ६५ वर्षीय अज्ञात वृध्दाचा मृतदेह संशयास्पदरीतया आढल्यामुळे खळबळ उडाली.

संशयास्पदरीत्या आढळला वृध्दाचा मृतदेह
अकोला : शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशन व सिव्हील लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीच्या मधोमध असलेल्या वृंदावन नगर जवळील रेल्वे रुळानजीक झाडा झुडपामध्ये एका ६० ते ६५ वर्षीय अज्ञात वृध्दाचा मृतदेह संशयास्पदरीतया आढल्यामुळे खळबळ उडाली. बुधवार ६ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही घटना उजेडात आली असून पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीला आहे.
वृंदावन नगर जवळील पिकेव्ही मार्गाकडे जाणाऱ्या तथा रेल्वे रुळानजीक असलेल्या काटेरी झाडाच्या झुडपामध्ये एक ६० ते ६५ वर्षीय वृध्दाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सिव्हील लाईन पोलिस व एम आय डी सी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतक वृध्दाच्या डोक्याला जखम असल्याची माहीत सुत्रांनी दिली असून या वृध्दाची हत्या करण्यात आली की त्याने आत्महत्या केली या बाबत शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे. काटेरी झाडेझुडपात हा मृतदेह असल्याने पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. वृध्दाने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबतचा खुलासा पोलिस तपासात समोर येईल. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.