शहरात आढळले तिघांचे मृतदेह

By Admin | Updated: May 23, 2017 01:05 IST2017-05-23T01:05:38+5:302017-05-23T01:05:38+5:30

अकोला: शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिघांचे मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघड झाली. यामध्ये एक मृतदेह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घराजवळ आढळला.

The bodies of the three found in the city | शहरात आढळले तिघांचे मृतदेह

शहरात आढळले तिघांचे मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिघांचे मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघड झाली. यामध्ये एक मृतदेह पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या घराजवळ आढळला असून, दुसरा मृतदेह बलोदे ले-आउटमध्ये तर तिसरा मृतदेह जुन्या बसस्थानकावर आढळला.
बलोदे ले-आउटमध्ये राजस्थानमधील रहिवासी पप्पू लाडाजी कुमावत या ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह असल्याची महिती खदान पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविला. जठारपेठ परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून, दुसरा मृतदेह जुन्या बसस्थानकावर आढळला असून, हा मृतदेह ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The bodies of the three found in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.