अकोल्यात भाजपा कार्यकर्त्याची हत्या; परिसरात तणावपूर्ण शांतता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 22:29 IST2019-05-24T22:28:13+5:302019-05-24T22:29:12+5:30
हल्ल्यात एक गंभीर जखमी; गावात तणावपूर्ण शांतता

अकोल्यात भाजपा कार्यकर्त्याची हत्या; परिसरात तणावपूर्ण शांतता
अकोट(अकोला) : तालुक्यातील मोहाळ्यात दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मतीन पटेल असं मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचं नाव असून तो भाजपाचा कार्यकर्ता आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे.
मोहाळा येथील मतीन पटेल यांच्यासह एकावर अज्ञात इसमांनी शुक्रवारी हल्ला केला. यामध्ये मतीन पटेल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारा एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची गावात माहिती मिळताच तणाव निर्माण होऊन दोन गट आमने सामने आले. अकोट ग्रामीण पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.