शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Akola: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 15:46 IST

Maratha Reservation : शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

अकाेला -  शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकू शकले नाही,पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. अकोला लोकसभा मतदार संघातील पश्चिम व पूर्व अकोला तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते रविवारी येथे बोलत होते. आरक्षणासाठी  लाखाे मराठा समाज बांधवांचा समावेश असलेले राज्यात मोर्चे निघाले परंतु तेव्हा शांतता होती. आता अशांतता कशी असा प्रश्नही उपस्थित करित मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. 

नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काही पक्षांना एक टक्यापेक्षा जास्त मते मिळाली नाहीत़ अॅड प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला उत्तम मते मिळाली असे असताना त्यांना बैठकीचे आमंत्रण दिले नाही.यातूनच काॅंग्रेस आणि शरद पवार यांचा आंबेडकरांप्रति असलेला द्वेष दिसून येत असल्याचा आराेप आ. बावनकुळे यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करायचे आहे. यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

२८ लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही संवाद यात्रा फिरत असून, हा तेरावा मतदारसंघ आहे. आगामी लाेकसभा निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणण्यासाठी संकल्प घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.आता ही पदयात्रा रद्द झाली असली तरी नोव्हेंबर मध्ये यात्रा काढण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंचावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती ,यात्रा संयोजक बाळ भेगडे, जयंत डेहनकर, किशोर मांगटे पाटील, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रदेश प्रवक्ता मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर,बळीराम सिरस्कार, वसंतराव खोटरे, डाॅ. रणजीत पाटील कृष्णा शर्मा, शाम बढे, माधव मानकर, संजय गोडा, संजय जीरापूरे, रमण जैन, अमोल साबळे, रमेश लोहकपुरे, संतोष पांडे ,अमोल गोगे, निलेश निनोरे, राजेश नागमते विराजमान होते. बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती हाेती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा