अकोल्यातील बिर्ला रेल्वे फाटक शनिवारपर्यंत रात्री बंद राहणार

By Atul.jaiswal | Updated: June 6, 2023 18:24 IST2023-06-06T18:23:36+5:302023-06-06T18:24:11+5:30

अकोला : न्यू तापडीया नगर व लगतच्या परिसराला शहराला जोडणारा मुख्य दुवा असलेले अकोला -यावलखेड लोहमार्गावरील बिर्ला मंदिर परिसरातील ...

Birla Railway Gate in Akola will remain closed till Saturday night | अकोल्यातील बिर्ला रेल्वे फाटक शनिवारपर्यंत रात्री बंद राहणार

अकोल्यातील बिर्ला रेल्वे फाटक शनिवारपर्यंत रात्री बंद राहणार

अकोला : न्यू तापडीया नगर व लगतच्या परिसराला शहराला जोडणारा मुख्य दुवा असलेले अकोला-यावलखेड लोहमार्गावरील बिर्ला मंदिर परिसरातील रेल्वे फाटक बुधवार, ७ जून ते शनिवार, १० जून या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी या फाटक अंतर्गत असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गावरून प्रवास अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय रेल्वे बांधकाम विभागाने घेतला आहे. हे काम करण्यासाठी बुधवार, ७ जून ते शनिवार,१० जून या कालावधीत फाटक रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत हे फाटक वाहतुकीसाठी खुले राहणार आहे.
 

Web Title: Birla Railway Gate in Akola will remain closed till Saturday night