शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:26 PM

अकोला : तितर-बटेर पक्षी पकडून त्याची तस्करी करणारी मोठी टोळी बाळापूर वन परिक्षेत्रात सक्रिय असल्याचा प्रकार उजेडात आला.

ठळक मुद्देनायलॉन दोऱ्याने  विणलेला पिंजरा वन परिक्षेत्रातून बुधवारी जप्त करण्यात आला. हा पिंजरा उचलून पाहिला असता, त्यात दोन पक्षी आढळून आलेत.बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली. बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली.

अकोला : तितर-बटेर पक्षी पकडून त्याची तस्करी करणारी मोठी टोळी बाळापूर वन परिक्षेत्रात सक्रिय असल्याचा प्रकार उजेडात आला. नायलॉन दोऱ्याने  विणलेला पिंजरा वन परिक्षेत्रातून बुधवारी जप्त करण्यात आला असून, अडकलेल्या दोन पक्ष्यांना जीवनदान देण्यात आले.बाळापूर तालुक्यातील वन परिक्षेत्रात आरएफओ कातखेडे, राऊंड आॅफीसर गीते आणि मानद वन्य जीव रक्षक बाळ काळणे दोघे वन परिक्षेत्रात परीक्षणासाठी गेले असता, त्यांना एका झाडाखाली टोपलीच्या आकाराचा पिंजरा आढळून आला. हा पिंजरा उचलून पाहिला असता, त्यात दोन पक्षी आढळून आलेत. या दोन्ही पक्ष्यांचे पाय नायलॉनच्या दोºयात अडकलेले असल्याने त्यांना बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली. दरम्यान, शोध घेऊनही येथे कुणी आढळले नाहीत. या घटनेचा मागोवा घेतला असता, तितर-बटेर आणि इतर पक्षी पकडणारी मोठी टोळी या परिसरात सक्रिय असल्याची माहिती समोर आली.*असा आहे नायलॉन पिंजरा....टोपलीच्या आकारासारखा नायलॉनच्या बारीक दोºयाने विणलेला हा पिंजरा पक्षी बसत असलेल्या झाडाखाली ठेवला जातो. त्या पिंजरच्या खाली शिकार फसावे म्हणून तांदूळ आणि गव्हाचे दाणे टाकले जातात. पक्षी दाण्यांना पाहून आकर्षित होतात. दाणे वेचण्यासाठी पक्षी पिंजºयावर पाय ठेवताच त्यांचे पाय नायलॉनच्या दोºयात फसतात अन् पक्षी पिंजºयात अडकतो. सकाळी असे पिंजरे वनपरिक्षेत्रात ठेवून सायंकाळी ते उचलले जातात. परिसरातील मांसाहारी हॉटेलमध्ये हे पक्षी महागड्या किमतीत विकल्या जातात.-वन परिक्षेत्रात आढळलेल्या पिंजºयाने परिसरात पक्ष्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या टोळीचा छळा लावण्याचे आव्हान वन विभाग आणि वन्य जीव विभागावर आहे. याची गंभीर दखल व्यक्तीश: घेण्यात आली आहे.-बाळ काळणे, मानद वन्य जीव रक्षक, अकोला.-----------------------फोटो आवश्यक

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणforest departmentवनविभाग