दुचाकी अपघातात माजी सभापती भाष्करराव सोनटक्के यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 17:12 IST2022-02-22T17:11:58+5:302022-02-22T17:12:04+5:30
Bhaskarrao Sontakke dies in two-wheeler accident : अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात माजी सभापती भाष्करराव सोनटक्के यांचा मृत्यू
मूर्तिजापूर : येथील पंचायत समितीचे माजी सभापती भाष्करराव सोनटक्के यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिल्याने त्यांचा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबी नजीक जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी ११:३० वाजताच्या दरम्यान घडली.
मूर्तिजापूर पंचायत समितीचे माजी सभापती भाष्करराव सोनटक्के (७९)राहणार आरखेड, मुक्काम शिवाजी नगर मूर्तिजापूर हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एक्स ३८५८ ने मूर्तिजापूर वरून अकोल्याच्या दिशेने जाताना सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूर येथील आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणला.