शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

महिला व बालकल्याण विभागाला सायकल वाटपासाठी लाभार्थी मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:49 PM

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे.

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण विभागाची मुदतवाढ‘बीएलओं’चे काम अंगणवाडीसेविकांना द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांकडून लाभाच्या योजना बारगळल्याने यावर्षी लाभार्थींना अर्ज करणेच बंद केले. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या लेडिज सायकल वाटपासाठी अर्जच न आल्याने अधोरेखित झाला आहे. त्यामुळे समितीने बुधवारी झालेल्या बैठकीत विविध योजनांसाठी अर्ज करण्याला पुन्हा मुदतवाढ देत आता १0 डिसेंबरपर्यंत अर्ज मागवले आहेत. समितीची बैठक सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्या ज्योत्स्ना बहाळे, माया कावरे यांच्यासह महिला व बालकल्याण अधिकारी योगेश जवादे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बैठकीत सौंदर्य प्रसाधने, ज्युडो कराटे प्रशिक्षणासाठी असलेला १५ लाखांचा निधी अंगणवाडीमध्ये सतरंजी खरेदीसाठी वळता करण्यात आला. सेसफंडातील लाभार्थी वाटप योजनांसाठी १0 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, पुरेशा संख्येएवढे अर्ज न आल्याने आणखी अर्जांची गरज आहे. त्यासाठी आता सर्वच योजनांसाठी १0 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला. विशेष म्हणजे, लेडिज सायकलीसाठी २९0 अर्जांची गरज आहे. प्राप्तपैकी ७३ अर्जांना मंजुरी देण्यात आली. 

‘बीएलओं’चे काम अंगणवाडी सेविकांना द्या!बैठकीत सदस्या माया कावरे यांनी निवडणुकीतील ‘बीएलओं’चे काम गावातील अंगणवाडीसेविकांना द्यावे, त्या गावातील रहिवासी असतात. नवमतदारांची त्यांना ओळख असते. त्यामुळे ते काम त्यांनाच द्यावे, असा ठराव समितीमध्ये त्यांनी घेतला. महिला व बालकल्याण अधिकारी जवादे यांनी महिला व बालकल्याण आयुक्तालयाने अंगणवाडीसेविकांना ते काम देता येत नसल्याबद्दल शासनाला आधीच कळवले आहे, असे सांगितल्यानंतरही ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवण्याची मागणी कावरे यांनी केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद