घरात डांबून मारहाण; ११ वर्षीय बहिणीचा अनन्वीत छळ

By आशीष गावंडे | Updated: January 13, 2024 22:01 IST2024-01-13T22:00:56+5:302024-01-13T22:01:12+5:30

सावत्र भाऊ, वहिनीला पाेलिसांनी केली अटक

beating at home; Police arrested 11-year-old sister's half-brother, sister-in-law | घरात डांबून मारहाण; ११ वर्षीय बहिणीचा अनन्वीत छळ

घरात डांबून मारहाण; ११ वर्षीय बहिणीचा अनन्वीत छळ

अकोला : खदान पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर सिंधी कॅम्प परिसरात एका ११ वर्षीय चिमुकल्या मुलीला त्याच्या सावत्र भावाने व वहिनीने घरात डांबून ठेवत प्रचंड मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर हा अमानुष छळाचा प्रकार समोर आला. याप्रकरणी खदान पाेलिसांनी मुलीचा सावत्र भाऊ व त्याच्या पत्नीला अटक केली आहे. 

शहरातील शास्त्रीनगर परिसरात राहणारे विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे हे त्यांच्यासोबत राहणाऱ्या सावत्र ११ वर्षीय मुलीला मागील एक आठवड्यापासून सतत मारहाण करीत असल्याची बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. या निष्पाप मुलीचा आवाज घराबाहेर जाऊ नये यासाठी तिच्या तोंडात बोळा कोंबन्यात येत हाेता, अशी माहिती शेजाऱ्यांनी पाेलिसांना दिली. शुक्रवारी रात्री या मुलीला बेदम मारहाण करण्यात आल्याने तीच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले हाेते. शेजाऱ्यांनी पुढाकार घेत त्या मुलीला सावत्र भाऊ व वहिनीच्या तावडीतून सोडवत खदान पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी खदान पाेलिसांनी विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे या दोघांना ताब्यात घेत कलम ३२३, ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

...तर गुन्ह्यात हाेणार वाढ
अल्पवयिन ११ वर्षाच्या बहिणीचा अनन्वीत शारिरिक छळ करणारा भाऊ व त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर प्राप्त अहवालानुसार गुन्ह्यातील कलमात आणखी वाढ हाेऊ शकते, असे खदानचे पाेलीस निरीक्षक धनंजय सायरे यांनी सांगितले.

Web Title: beating at home; Police arrested 11-year-old sister's half-brother, sister-in-law